निरा-पुरंदर : पुरंदर रिपोर्टर Live
मौजे नीरा-शिवतक्रार येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ते शिवतक्रार गावठाण प्रमुख रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत खराब अवस्थेत असल्याने ग्रामस्थांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. शाळेत जाणारी लहान मुले, महिला, चालत जाणारे नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनधारक यांना या रस्त्यामुळे प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व श्री. दत्ताजीराव चव्हाण, माजी सभापती, जिल्हा परिषद पुणे यांनी केले.तसा पत्रव्यवहार त्यांनी संबंधित विभागांना केला होता.
ग्रामस्थांनी यापूर्वीही वारंवार शासन व लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन मागणी केली होती, मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी लोकशाही मार्गाने आंदोलन उभारावे लागले. आंदोलनादरम्यान अनेक नागरिकांनी आपला तीव्र रोष व्यक्त केला. मुख्य रस्ता होणे कामी सर्व गाव एकवटले होते.
यामधे लक्ष्मणदादा चव्हाण चंद्रकांत धायगुडे, अनिल चव्हाण , गणपत लकडे , मुगुट धायगुडे, दादासाहेब गायकवाड, राजकुमार शहा, सचिन मोरे, रामदास लकडे, अमोल साबळे, महेश जेधे,नंदकुमार धावरे, दयानंद चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले व आपल्या तीव्र भावना मांडल्या. विजय धायगुडे यांनी आंदोलन स्थळी सूत्रसंचालन करून आपले म्हणणे मांडले
ग्रामस्थांच्या मागणीवरून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलन स्थळी निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तसेच पोलिस प्रशासनाच्या विनंतीवरून आंदोलन स्थगित करण्यात आले.
या आंदोलनात लक्ष्मण चव्हाण, चंद्रकांत धायगुडे, कल्याण जेधे,मदन चव्हाण, शिवाजी लकडे, गणपत लकड़े , भाऊसाहेब धायगुडे, नामदेव बिचकुले,नामदेव धायगुडे विश्वास लकडे, पोपट धायगुडे, कांतीलाल ताकवले, जेधे साहेब, बाळासाहेब ननावरे, अनिल चव्हाण, राजेश चव्हाण, दादासाहेब गायकवाड, मुन्ना डांगे,मनोज शहा,राजू शहा, चांदभाई पठाण, विलास धायगुडे, संतोष लकडे, किरण जेधे, दयानंद चव्हाण, रामभाऊ ताकवले, नारायण कर्णवर, किरण धायगुडे, शरद जगदाळे, विजय धायगुडे, निखिल लकडे, शेखर लकडे, सुनील धायगुडे, महेश धायगुडे,जितेंद्र जठार, अक्षय लकडे ज्ञानदेव धायगुडे, शिवाजी वळकुंदे, किरण धायगुडे भैय्या लोणकर, सचिन मोरे, अमोल साबळे, अजित सोनवणे, महेश जेधे, संभाजीराव जेधे, दादा पोकळे, संदीप पोकळे, सुभाष पवार, किसन चिरणे, धुमाळ आण्णा, अंकुश लकडे, रूपेश ढावरे, धनंजय लकडे, मानसिंग जेधे, बाळासाहेब मोटे, संतोष जेधे, नवा ताकवले, नीलेश गोरे, दीपक जाधव तसेच शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी जिल्हा नियोजन व इतर फंडातून तातडीने रस्ता करण्याची मागणी केली असून, प्रशासनाने यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.



0 Comments